News Flash

अमेयनं दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का?

ऐन गणेशोत्सवात अमेय कोणतं आव्हान देत आहे, हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना?

अमेय वाघ

पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं असलं तरीही सध्या गणोशोत्सवाची धूम मात्र सुरु असल्याचं पाहयला मिळत आहे. या उत्सवाच्या दिवसांमध्ये सर्वांचे लाडके कलाकार मंडळीही मागे राहिलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपआपल्या परिना बाप्पाच्या येण्याचा आनंद साजरा करत आहे. याच आनंदात अभिनेता अमेय वाघही सहभागी झाला असून त्याने सर्वांनाच एक आव्हान दिलं आहे.

आता ऐन गणेशोत्सवात अमेय कोणतं आव्हान देत आहे, हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना? जास्त विचार करण्याची किंवा ‘बनेश फेणे’प्रमाणे एखाद्या गोष्टीविषयी शोधक वृत्तीने या उत्तरामागे जाण्याची गरज नाही. कारण खुद्द अमेयने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याविषयीची माहिती मिळत आहे.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

गणपती म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आणि मोदकांचा नैवेद्य आलाच. बाप्पाच्या आवडीचे हेच मोदक म्हणजे अनेकांच्या अवडीच्या पदार्थांमध्ये अग्रस्थानी असतात. याचसंबंधीचं आव्हान देत अमेयने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या पुढ्यात एका भांड्यामध्ये बरेच मोदक पाहायला मिळत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘मी पैज लावून २१ मोदक खाणार; तुम्ही किती खाऊ शकता.?’ अमेयच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लगेचच कमेंट करण्यास सुरुवात करत आपलं मोदक प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. मुळात त्याने दिलेलं हे चॅलेंज चाहत्यांनी तितक्याच स्पर्धात्मक वृत्तीने स्वीकारत मोदक फस्त केले असणार यात शंका नाही. तुमचं काय…? तुम्ही स्वीकारणार का अमेयचं हे चॅलेंज? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 11:27 am

Web Title: marathi actor amey wagh ganapati festival ganeshotsav 2018 challenge
Next Stories
1 ‘राजी’ दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दीपिका?
2 ‘मेड इन चायना’मध्ये राजकुमार रावसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री
3 Video : ‘या’ गाण्यातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत झळकणार स्पृहाचा पती
Just Now!
X