News Flash

Lockdown : ‘आईच्या त्या प्रश्नांची किंमत कळते’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला बालपणीचा फोटो

तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला?

सध्याच्या काळात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. अनेक सेलिब्रिटीही इन्स्टाग्राम, ट्विटर या सारख्या सोशल माध्यमांच्या सहाय्याने चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यात बऱ्याच वेळा ही सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या जीवनातील अनेक रंजक किस्से, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. मात्र यावेळी एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करत लॉकाडाउनच्या काळात आईला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात अनेक जण घरात अडकले आहेत. तर काही जण घरापासून दूर आहेत. त्यामुळे या काळात प्रत्येक जण कोणती ना कोणती गोष्टी मिस करत आहे. यातच अभिनेता अमेय वाघदेखील त्याच्या आईला मिस करत असल्याचं त्याने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. अलिकडेच त्याने आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अमेयच्या बालपणीचा असून यात अमेयला ओळखताही येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

माऊली Woods #waghchaswag

A post shared by amey wagh (@ameyzone) on

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’ किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ यांच्या माध्यमातून अमेयने त्याच्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. नाटक,मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांमध्ये झळकलेल्या अमेयने कलाविश्वात त्याच स्वत: स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 4:12 pm

Web Title: marathi actor amey wagh share childhood photos ssj 93
Next Stories
1 “सुशांतच्या मृत्यूमागे मोठा कट”; न्यायालयीन चौकशी करण्याची भाजपा खासदाराची मागणी
2 Video : सुशांतच्या आत्महत्येमुळे भावूक झालेल्या अंकिताने घेतली कुटुंबीयांची भेट
3 सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीबाबत रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा