मराठी चित्रटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीचा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो तब्बल एका वर्षानंतर पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील स्क्रीन शेअर करणार आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात त्याला दोन खास व्यक्तींना ट्रिपल सीट घेऊन जायला आवडेल असं त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला.

‘खरं तर मी कधीच कोणाला बाइकवर घेऊन जात नाही. मात्र जर अशी वेळ आलीच तर मला पत्नी आणि मुलाला ट्रिपल सीट घेऊन जायला आवडेल’, असं अंकुशने सांगितलं.

वाचा : Photo : शेवंताच्या लहानपणीचे क्यूट फोटो पाहिलेत का ?

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवानी सुर्वे आणि अंकुश चौधरी स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री पल्लवी पाटीलदेखील झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांनी केलं आहे. तगडी स्टारकास्ट, अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल ”सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.