आपल्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या अरुण कदम या अभिनेत्याने कलर्स मराठीवरील ‘तुमच्यासाठी कायपन’ या कार्यक्रमासाठी मिशी कापली. गेल्या २० वर्षांमध्ये त्याने मिशी कापली नव्हती. अरुण कदम नाव घेतले की आजही सगळ्यांच्या डोळ्यासमोर मिशी असलेला अरुणच दिसतो. याच मिशीवर भारुळ त्याची बायको त्याच्या प्रेमात पडली होती मात्र जेव्हा तो मिशी कापून घरी गेला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला घराबाहेरच थांबवलं. मात्र त्याने जेव्हा सांगितलं त्याचे पहिले प्रेम प्रेक्षक आहे आणि त्यांच्यासाठी त्याला हे करणं भाग आहे तेव्हा त्याच्या बायकोलाही याचा अभिमान वाटला आणि तिही अभिमानाने ‘तुमच्यासाठी कायपन’ असेच म्हणाली.

लवकरच कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेला ‘तुमच्यासाठी कायपन’ हा धमाल शो. या नावाप्रमाणेच यातले कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायपण करायची तयरी ठेवतात. अरुण कदम या कार्यक्रमातून त्याची वेळी ओळख प्रेक्षकांना दाखवणार आहे. अरुण कदम हे नाव आज महाराष्ट्राला अपरिचित नाही. त्यांचे नाव घेतले की डोळ्यासमोर येतो त्याचा चेहरा.. त्यावरचे हसरे भाव आणि त्यात दडलेला त्याचा मनमिळाऊ स्वभाव.. अरुणने आजवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वाटेल ते केलंय.. कधी रंगभूमीच्या ओढीने नोकरीचा त्याग केला तर कधी चित्रीकरणाशी केलेल्या कमिटमेंटमुळे खासगी आयुष्यातील काही आवडत्या क्षणांना मुकले.. त्याचे एक वाक्य कायम राहील ते म्हणजे तुमच्यासाठी कायपन…!