News Flash

अभिनेते अशोक शिंदेंना झाला करोना

सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. एकीकडे लसीकरण सुरु आहे तर दुसरीकडे करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा चिंता वाढवत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच कलाकार देखील करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहे. आता अभिनेते अशोक शिंदे यांना करोना झाल्याचे समोर आले आहे.

मराठमोळे अभिनेते अशोक शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो, सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि माझे औषधोपचार सुरु केले आहेत’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील मराठमोळ्या अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी मागितली मदत

पुढे ते म्हणाले, ‘मी सर्वांना विनंती करतो, गेल्या १५ दिवसात जे माझ्या संपर्कात आले त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्या. काळजी घ्या सुरक्षित रहा.’ त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या पाठोपाठ सलील कुलकर्णी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता अशोक शिंदे यांना करोना झाल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 2:02 pm

Web Title: marathi actor ashok shinde corona positive avb 95
Next Stories
1 सोनू सूदसाठी चाहत्याचं नवरात्री व्रत; उपवास करणाऱ्या फॅनला सोनू म्हणाला…
2 मेसेज बॉक्समध्ये नेटकऱ्यांचे विचित्र प्रश्न; “इतके छोटे कपडे का घातले?” विचारणाऱ्याला फातिमा म्हणाली..
3 सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचं निधन
Just Now!
X