संगीत क्षेत्रातील लोकप्रिय निर्मिती संस्था टिप्सने आपल्या दर्जेदार कलाकृतींनी रसिकांची मनं जिंकली आहेत. भारतीय संगीत सर्वदूर पोहोचवत असतानाच त्यांनी कलाविश्वातही त्यांचे पाय भक्कमपणे रोवले आहेत. त्यातच आता ते मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहेत. टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युट्युबवर सध्या ‘गोल्डीची हळद’ हे नवीन गाणं तुफान गाजत आहे. या गाण्यात विनोदवीर भाऊ कदम झळकला आहे. विशेष म्हणजे भन्नाट गाणं आणि भाऊ कदमची डान्सिंग स्टाइल यामुळे हे गाणं लोकप्रिय होत आहे.

दरम्यान, याप्रमाणे अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत टिप्स नवीन गाणी घेऊन येणार आहे. तसंच गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याला आवाज देणारे रजनीश पटेल टिप्सच्या अंतर्गंत लव्ह फिव्हर हे नवीन गाणं घेऊन येत आहेत. टिप्सच्या आगामी गाण्यांमध्ये सावनी रवींद्र, धृवन मूर्ती, निलेश पाटील, रुपाली मोघे, अभिषेक तेलंग संगीत विश्वातील या आघाडीच्या तरुण गायकांचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor bhau kadam new song golde chi halad ssj
First published on: 27-02-2020 at 15:52 IST