News Flash

Video : लग्नाविषयीची ‘ही’ गोष्ट आजही आईला माहित नाही; चिन्मयच्या लव्हस्टोरीतला भन्नाट किस्सा

जाणून घ्या, चिन्मय उदगीरकरची भन्नाट लव्हस्टोरी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता चिन्मय उदगीरकर हे नाव मराठी प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. ‘स्वप्नांच्या पलीकडले’,’नांदा सौख्य भरे’ आणि ‘घाडगे & सून’ या मालिकांमधून चिन्मयने प्रत्येक मराठी कुटुंबाच्या घरात स्थान मिळवलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्याची अफाट लोकप्रियता पाहायला मिळते. आज चिन्मयचा वाढदिवस त्यामुळे त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अलिकडेच चिन्मयने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे.

दरम्यान, आजही चिन्मय आणि त्याच्या पत्नीमध्ये नवरा-बायकोपेक्षा मैत्रीचं नात जास्त आहे, असं चिन्मयने या मुलाखतीत सांगितलं. तसंच लव्हचं अरेंजमॅरेज कसं केलं याचा खुलासादेखील त्याने केला आहे. चिन्मय हा लोकप्रिय कलाकार असून मालिकांसोबतच त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘श्यामचे वडील’, ‘वाजलंच पाहिजे’, ‘मेकअप’ या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 11:50 am

Web Title: marathi actor chinmay udgirkar talking about his lovestory ssj 93
Next Stories
1 १ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायलची माघार; ‘या’ अभिनेत्रीची माफी मागण्यास तयार
2 ‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाची करोनावर मात
3 अक्सा बीचवर पुन्हा त्यांची भेट झाली अन्…; शाहरुख-गौरीची हटके लव्हस्टोरी
Just Now!
X