05 April 2020

News Flash

“वाहतूक कोंडीतील वाहनांमध्येच नागरिकांची स्मारकं उभी राहणार”

चिन्मयने बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांवरही टीका केली असून ते शुभेच्छा देण्यात गुंतले असल्याचं म्हटलं आहे

ठाण्यातील वाहतूक कोंडी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर तोडगा निघण्याऐवजी समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ठाण्यात होणाऱ्या अभुतपूर्व वाहतूक कोडींवर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. या वाहतूक कोंडीचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रेटींनाही करावा लागतो. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यालादेखील वाहतूक कोडींचा फटका बसला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. चिन्मय मांडलेकरने फेसबुक पोस्ट टाकत आपलं म्हणणं मांडलं आहे.

वाहतूक कोंडीमुळे बिल्डर धास्तावले
ठाण्यात अवजड वाहने मोकाट

चिन्मयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, विले पार्लेपासून ते ठाणे पोहोचण्यासाठी त्याला चार तास लागले. यावेळी त्याने मेट्रोची कामं, खड्डे, अवजड वाहनं, नियम न पाळणारे टोलनाके असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. चिन्मयने बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांवरही टीका केली असून ते शुभेच्छा देण्यात गुंतले असल्याचं म्हटलं आहे. बहुतेक आमच्या रखडलेल्या वाहनांमध्येच एकदिवशी आमची स्मारकं उभी राहणार! असा संताप चिन्मयने व्यक्त केला आहे. यावेळी त्याने #savethanefromtrafficjams हा हॅशटॅग वापरला आहे.

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये ?
विलेपार्ले येथे तासाभराची मीटींग संपवून ७:२९ ला निघालो. ठाण्याला पोहोचण्याची वेळ ११:२८. ४ तास! आणि आता हे ठाणेकरांचं रोजचंच मरण झालेलं आहे. मेट्रो आणि सेवा रस्त्यांची एकाचवेळी काढलेली अनियोजित कामं, रस्त्यांना आणि पुलांवर पडलेले अभूतपूर्व खड्डे, सगळे नियम फाट्यावर मारुन शहरात कधीही घुसणारी अवजड वहानं, आणि या मरणात ही आमच्या टाळूवरवं लोणी खाणारे जाचक टोलनाके, ज्यांनी पिवळ्या पट्ट्याचा नियम कधीच कचरापेटीत फेकला आहे; आमच्या दुर्दशेची अनेक कारणं आहेत. आणि अशात आमचे सगळे नेते बॅनर लावून एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात किंवा आम्हा पामरांना सणांच्या शुभेच्छा देण्यात गुंतले आहेत. या राक्षसी कोंडीबद्दल बोलताना कुणीच दिसत नाही. बहुतेक आमच्या रखडलेल्या वाहनांमध्येच एकदिवशी आमची स्मारकं उभी रहाणार! #savethanefromtrafficjams

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 6:35 pm

Web Title: marathi actor director chinmay mandlekar facebook post on thane traffic jam sgy 87
Next Stories
1 Raksha bandhan 2019 : साराने शेअर केला भावासोबतचा खास फोटो
2 अक्षय कुमार ‘या’ अभिनेत्रीसाठी बनला मेकअप आर्टिस्ट
3 अक्षय कुमारने विद्या बालनच्या लगावली कानाखाली, जाणून घ्या कारण
Just Now!
X