27 February 2021

News Flash

नवं आव्हान स्वीकारण्यास प्रवीण तरडे सज्ज; ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदाच हाताळणार प्रेमकथा

जाणून घ्या, प्रवीण तरडेंच्या आगामी चित्रपटाचं हटके नाव

अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन राहिलेलं नाही. दमदार कथानक आणि उत्तम अभिनय शैली यांच्या जोरावर प्रवीण तरडे यांनी मराठी प्रेक्षक वर्गाच्या मनात एक हक्काची जागा मिळवली आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच त्यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचीदेखील घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ते कधीही न हाताळलेला विषय प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर प्रवीण तरडेंचा ‘कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्त्राइल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर लव्हस्टोरी उलगडण्यात येणार आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सर्वत्र या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली असून या चित्रपटाविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

“माझ्या आगामी प्रोजेक्टच्या माध्यमातून मी एक लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. मात्र, ही प्रेमकथा सामान्य प्रेमकथेसारखी नाही. माझे चित्रपट हे कायम शेतकरी किंवा सामाजिक विषयांशी निगडीत असतात. त्यातून मी सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. हेच मुद्दे आगामी प्रेमकथेतदेखील पाहायला मिळतील. माझ्या नव्या चित्रपटाचं नाव ‘कोल्हापूर ते बुलढाणा व्हाया इस्त्राइल’ असं आहे”, असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “इस्त्राइलमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही. मात्र, तरीदेखील त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्रदेखील याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील. तसंच या चित्रपटातून नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील”.

दरम्यान, प्रवीण तरडे अभिनेता, दिग्दर्शक असण्यासोबतच उत्तम लेखकदेखील आहेत. सध्या ते ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तसंच लवकरच त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा राधे हा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 8:40 am

Web Title: marathi actor director pravin tarde announces his next movie kolhapur to buldhana via israel it is a love story ssj 93
Next Stories
1 मराठीतही ‘सर सर सरला’
2 सिद्धार्थ चांदेकरचे मालिकेद्वारे पुनरागमन
3 ‘बॉलीवूड वाईव्हज’वरून रंगलेला वाद
Just Now!
X