करोना संकटातही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात नसला तरी गणेशभक्तांमधील उत्साह मात्र कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकारणी, सेलिब्रिटींनीही आपल्या घरात गणपती प्रतिष्ठापना केली असून यासाठी वेगवेगळी थीम तयार केली आहे. दरम्यान मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गणपतीसाठी करण्यात आलेल्या सजावटीमुळे टीका करण्यात आली. यानंतर प्रवीण तरडे यांनीही आपली चूक मान्य करत दलित समाजाची जाहीर माफी मागितली आहे.

काय झालं होतं?
प्रवीण तरडे नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुस्तक गपणती ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केलं होतं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली.

bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
jitendra awhad Prakash Ambedkar (1)
“…तर पुढची पिढी माफ करणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना टोला; म्हणाले, “संविधानाविरोधात…”
Sanjay Raut Prakash ambedkar (1)
“वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, “एकट्या काँग्रेसला…”

प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले.

जाहीर माफीनामा –
टीका होऊ लागल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली. सोबतच माफी मागणारा एक व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. पण मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, तसंच ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागतो”.

प्रवीण तरडे यांनी यावेळी माझी चूक मान्य करतो सांगत केलेला बदलही दाखवला आहे. “मी खूप समाजिक भावना जपतो. याआधी कधीच चूक झालेली नाही आणि होणार नाही. पुन्हा एकदा सर्व दलित बांधव ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या त्यांची मी जाहीर माफी मागतो,” असं ते व्हिडीओच्या शेवटी बोलले आहेत.