News Flash

अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव करोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती

देशातील करोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

करोनाच्या संसर्गाचा फटका मनोरंजन क्षेत्रालादेखील बसतोय. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. आलिया भट्ट, अक्षय कुमारला करोनाची लागण झाली आहे. यातच आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा- करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…

प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला आहे, ” मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी करोना चाचणी पॉझिविव्ह आली. सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या. ” अशी पोस्ट करत प्रियदर्शनने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी चिंता व्यक्त करत काळजी घेण्यास सांगितलं आहे.

आणखी वाचा- ‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण

प्रियदर्शन जाधव सध्या ‘लव्ह सुलभ’ या सिनेमाचं काम करत होता. या सिनेमात प्रियदर्शन लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे. प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर कलाकाल या सिनेमामध्ये झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:12 pm

Web Title: marathi actor director priydarshan jadhav tested positive share news on instagram kpw 89
Next Stories
1 अनुष्काची प्रेरणा आणि विराटची खास कामगिरी…
2 इरा नव्हे तर हे आहे आमिरच्या लेकीचं खरं नाव; “चुकीचं नाव उच्चारल्यास ५ हजार दंड”
3 करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…
Just Now!
X