22 September 2020

News Flash

‘तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय’; किल्ल्यांची दुरावस्था पाहून हेमंत ढोमेचं ट्विट

किल्ल्यांची दुरावस्थापासून हेमंत ढोमे संतापला

मराठी कलाविश्वातील अभिनेता हेमंत ढोमे अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर व्यक्त होत असताना अनेकदा तो त्यांचा संताप व्यक्त करत असतो. यावेळीदेखील त्याने ट्विट करत गड-किल्ल्यांच्या झालेल्या दुरावस्थेविषयी राग व्यक्त केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव जपण्यास आपण कमी पडतोय’, असं तो म्हणाला आहे.

आपल्या देशाला गड-किल्ले असं मोठं वैभव लाभलं आहे. परंतु, सध्या हे गड-किल्ले जीर्णावस्थेत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे हेमंत संतापला आहे. त्याने विजयदुर्ग किल्ल्याचा ढासळलेला भागाचा फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय.. #विजयदुर्ग_किल्ला_वाचवा_अभियान”, असं ट्विट हेमंतने केलं आहे.

दरम्यान, हेमंत ढोमे सोशल मीडिया सक्रिय असून बऱ्याच वेळा तो व्यक्त होत असतो. यावेळीदेखील त्याने ट्विट केल्यामुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 8:34 am

Web Title: marathi actor hemant dhome say save the architectural fort ssj 93
Next Stories
1 “किशोरदांसारखा ना कोणी होता, न कोणी होणार”; जावेद अख्तर यांनी दिला आठवणींना उजाळा
2 “तुमच्यासाठी आदर राहिला नाही”, नानावटीवरून टीका करणाऱ्या महिलेला बिग बींनी दिले उत्तर
3 VIDEO : “सुशांतला न्याय मिळायलाच हवा”; अनुपम खेर यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
Just Now!
X