मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत यांचा स्मृतिदिन. सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.

मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या लक्ष्याने युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं. याचदरम्यान कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकांमध्ये सहभाग घेत होते. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्यांनी बॅक स्टेजवरही काम केलं. याकाळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा प्रवास सुरु असतानाच त्यांच्या ‘टूरटूर’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं. त्यानंतर त्यांना महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. ‘टूरटूर’ आणि ‘धुमधडाका’ या दोन्ही माध्यमातून त्यांनी आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

नाटकाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्र…’ स्वीकारले. मराठी नाटक, चित्रपटांचा हा प्रवास सुरु असतानाच ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामधून त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्यांनी काम केले.

मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’ असे करत करत ते डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ (१९९२) पर्यंत पोहचले. त्याच्या कारकीर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली होती.