‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणाऱ्या तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या. ‘थँक यू विठ्ठला’ या आगामी मराठी चित्रपटात मकरंद मुंबईच्या डबेवाल्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. एम.जी.के. प्रोडक्शनची प्रस्तुती तसेच गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांनी केलं असून, या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. ३ नोव्हेंबरला ‘थँक यू विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेच्या माध्यमातून डबेवाल्यांच्या अनोख्या विश्वाचा वेध घेतला जाणार आहे. एकसंध राहत सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभागी होणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचं प्रतिनिधीत्व करणारी भूमिका साकारताना आजवर केलेल्या कामापेक्षा काहीतरी खूप वेगळं केल्याचं समाधान लाभल्याची भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे. कंटाळवाणं दैनंदिन जीवन जगणाऱ्या मकरंदने साकारलेल्या डबेवाल्याला भगवान विठ्ठलाची साथ लाभल्यानंतर त्याच्यात काय बदल होतात आणि त्यानंतर त्याचा जीवनप्रवास कसा सुखकर होतो ते ‘थँक यू विठ्ठला’ या चित्रपटात पाहायला मिळेल.

Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

या चित्रपटात मकरंदच्या जोडीला महेश मांजरेकर, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकूब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद सफई, सतिश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. चित्रपटाला रोहन-रोहन यांच संगीत लाभलं आहे. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.