News Flash

फोटोशूटच्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ; मराठी अभिनेत्याला अटक

पुण्यातील प्रभात रोड येथील ही घटना आहे.

मंदार कुलकर्णी

फोटोशूटदरम्यान अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मराठी अभिनेता मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील प्रभात रोड येथील ही घटना आहे. बळजबरीने अर्धनग्नावस्थेत फोटो काढल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. २३ ऑगस्ट रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती.

संबंधित मुलगी विद्यार्थिनी असून अभिनयात रस असल्याने तिने नाट्यशिबीरात भाग घेतला होता. जानेवारी महिन्यात शनिवार पेठ येथील वर्कशॉपदरम्यान तिची मंदारशी भेट झाली. एका नाटकाच्या ऑडिशनसाठी मंदारने तिला काही फोटोशूट करण्यास सांगितले. या फोटोशूटसाठी त्याने प्रभात रोडवरील बसंत बहार अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितले.

आणखी वाचा : ”दिग्दर्शक वारंवार हॉटेलमध्ये बोलवत होता,” विद्या बालनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

फोटोशूटसाठी गेली असता मंदारने तिला पाच ड्रेस परिधान करण्यात दिले होते. त्यापैकी तीन ड्रेसवरील फोटो काढून झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घालण्यास सांगितले. मंदारची मागणी ऐकून ती मुलगी गोंधळली आणि बिकिनीत फोटोशूट करण्यात नकार दिला. या मुलीने विरोध करूनदेखील मंदारने बिकिनीमध्ये फोटोशूट करून घेतले. हे फोटोशूट केल्यानंतर याविषयी घरात सांगू नकोस असेदेखील तिला धमकावण्यात आले होते.

मंदार कुलकर्णीने ‘पक्के शेजारी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याने ‘लग्नबंबाळ’ या व्यावसायिक नाटकातदेखील काम केलं होतं. त्याने पुण्यात अनेक नाट्यशिबीरं घेतली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 5:47 pm

Web Title: marathi actor mandar kulkarni arrested for sexually harassing minor at a photo shoot ssv 92
Next Stories
1 मानधन कमी मिळाल्याने अभिनेत्रीचा बिग बॉस १३ला नकार
2 ”भन्साळी गद्दारी करणार नाहीत,” चित्रपटाच्या वादावर सलमानने सोडलं मौन
3 जेव्हा शिवानीने दिली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी भेट
Just Now!
X