05 August 2020

News Flash

मिलिंद गुणाजींच्या ‘या’ कामामुळे सेटवर सारे थक्क!

'गोष्ट एका पैठणीची'मध्ये मिलिंद गुणाजी महत्त्वपूर्ण भूमिकेत

मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमधून खलनायक साकारणारा अभिनेता मिलिंद गुणाजी लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ या मालिकेत मिलिंद गुणाजी महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा रंगत आहे. मिलिंद गुणाजी कायमच त्यांच्या कामातील वक्तशीरपणामुळे ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांच्या कामातील अचुकता आणि कामाप्रतीचं प्रेम नुकतंच गोष्ट एका पैठणीच्या सेटवर पाहायला मिळालं.

‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी मिलिंद यांनी चित्रपटाची संहिता मागून घेतली. त्यानंतर ते अन्य एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँकॉकला रवाना झाले. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर ते लगेचच गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. इतकंच नाही तर ज्यावेळी खऱ्या अर्थाने चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं त्यावेळी त्यांचे सर्व संवाद तोंडपाठ होते. त्यांच्या कामातील हा वक्तशीरपणा पाहून सारेच जण भारावून गेले होते.

या चित्रपटामध्ये मिलिंद गुणाजींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यात ते इनामदार ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. इनामदार या भूमिकेसाठी मिलिंद गुणाजी यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय अचूक आहे. त्यांची आवाज, उंची, अभिनयाच्या जोरावर या भूमिकेला न्याय दिला आहे. तसंच त्यांचं शिस्तबद्ध वागणंही प्रेरणादायी आहे, असं निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं.

या चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं असून निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजीसोबत सायली संजीव आणि सुव्रत जोशी हेदेखील झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:35 pm

Web Title: marathi actor milind gunaji upcoming movie gosht eka paithanichi ssj 93
Next Stories
1 आता बॉलिवूडमध्ये सौरव गांगुलीची ‘दादागिरी’?
2 बलात्काराचे आरोप सिद्ध होताच चित्रपट निर्मात्याला आला हार्ट अटॅक
3 लवकरच होणार मोठ्या पडद्यावर ‘झोलझाल’
Just Now!
X