News Flash

फोटोतला ‘हा’ चिमुकला आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेता; बिग बींसोबत केलंय काम

ओळखा पाहू कोण आहे 'हा' लोकप्रिय अभिनेता

आजच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे एकमेकांपासून दूर असलेल्या अनेक व्यक्ती या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. यातच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटीदेखील इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सारख्या माध्यमांचा वापर करत असतात. अनेक वेळा ते या माध्यमांमधून त्यांचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा या सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. यातच सध्या एका अभिनेत्याच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.

‘भूतनाथ रिटर्न्स’,’किल्ला’ या चित्रपटांमध्ये झळकलेला पार्थ भालेराव हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. पार्थ सोशल मीडियावर सक्रीय असून अनेक वेळा तो त्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यामध्येच त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Happy birthday आई! Thanks for all the काजळ love

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao) on

त्याने त्याच्या आईसोबतचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो एका फोटोत आईजवळ बसला आहे. तर त्याचा दुसरा फोटो त्याच्या मुंजीच्या दिवसाचा असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

फॉर्मलिटी एन ऑल #fakesmiles

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao) on

दरम्यान, सध्या चाहत्यांमध्ये पार्थच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा पार्थने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. पार्थ लवकरच डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:09 pm

Web Title: marathi actor parth bhalerao childhood photo with mother ssj 93
Next Stories
1 दाक्षिणात्य ‘हिट’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार राजकुमार राव
2 ‘जीव झाला येडापिसा’च्या चित्रीकरणाला सुरुवात; ‘या’ दिवशी नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
3 शिल्पा शेट्टी जपानमध्ये ‘बाजीगर’मधील गाण्यावर करतेय डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल…
Just Now!
X