भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर. क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलू असलेले सावरकर यांची येत्या २८ मे रोजी १३७ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी सावरकरांना मानवंदना दिली आहे.

वि.दा. सावरकर यांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गाणं आजही ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना मातृभूमीची ओढ सावरकरांनी या कवितेतून व्यक्त केली होती. त्यामुळे ही कविता ऐकताना आजही डोळ्यासमोर वि. दा. सावरकरांची प्रतिमा उभी राहते. त्यातच त्यांची १३७ वी जयंती येत असल्यामुळे मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी एकत्र येऊन ने मजसी ने या गाण्यावर एक छान व्हिडीओ तयार करुन सावरकरांना मानवंदना दिली आहे. हा व्हिडीओ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ

“ने मजसी ने परत मातृभूमीला” हे गाणं कानावरुन नुसतं ओझरतं गेलं, तरी आपल्या डोळ्यासमोर, ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली, भारतमातेच्या, आपल्या जिवलगांच्या भेटीसाठी व्यथित झालेली स्वातंत्र्यवीरांची प्रतिमाच उभी राहते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आपल्या उत्तुंग कर्माने सिद्धहस्त झालेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व. येत्या २८ मे २०२० रोजी आपण सावरकरांची १३७ वी जयंती साजरी करत आहोत. आम्हा कलाकारांकडून या क्रांतीसुर्याला ही एक मानवंदना”, असं कॅप्शन प्रशांत दामले यांनी व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सावरकर यांच्या जीवनातील अनेक गोष्टी दाखविल्या आहेत. यात सावरकर यांचे काही जुने फोटो, त्यांचे कुटुंबीय, सावरकर कोठरी आणि त्यांचे पत्र असं त्यांच्याशी निगडीत अनेक यात पाहायला मिळत आहेत.