सध्याचा काळ हा वेबविश्वाचा असल्याचं म्हटलं जातं. केवळ इंग्रजीच नव्हे तर हिंदी, मराठी, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये वेबसीरिजची निर्मिती होऊ लागली आहे. या वेबसीरिजची तरुणाईमध्ये क्रेझ असल्यामुळे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांचा मोर्चा वेबसीरिजकडे वळविला आहे. विशेष म्हणजे यात मराठी कलाकारही मागे नाहीत. जितेंद्र जोशी, रिंकू राजगुरू अशा अनेक कलाकारांनी आतापर्यंत वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने वेबसीरिजची वाट धरली आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

‘टाईमपास’, ‘हलाल’, ‘चोरीचा मामला’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला प्रियदर्शनने भुताटलेला या सीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण केलं आहे. ही सीरिज हॉरर-कॉमेडी असून मराठीसह हिंदीमध्येही प्रदर्शित झाली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, भुताटलेला या सीरिजमध्ये प्रियदर्शन जाधवने रायबाची भूमिका केली आहे. तर अभिनेत्री सुरभी हांडे शिवानीची भूमिका साकरली  आहे. विशेष म्हणजे या सीरिजची कथा रायबा आणि शिवानी यांच्या लग्नापूर्वी घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. रायबा आणि शिवानीचं लग्न ठरल्यानंतर ऐन हळदीच्या दिवशी रायबाला कोणीतरी अज्ञात व्यक्ती पाठलाग करत असल्याची जाणीव होते आणि तेथून ही सीरिज खऱ्या अर्थाने सुरु होते. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील ही कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करणार असून ही सीरिज एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे.