महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहितच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. असाच किस्सा घडला ‘सोहळा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या यशामागचं रहस्यदेखील उलगडलं. त्यातच चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सचिन पिळगावकर यांच्या शिस्तीविषयी एक नवी ओळखही करून दिले.

सचिन पिळगांवकर गेले कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. चित्रपट, नाटक, मालिकांमधून त्यांनी त्यांच्यातील अभिनयाची चुणूक दाखविली. केवळ इतकंच नाही तर स्वत:ला सिद्धही केलं. मात्र या साऱ्यामागे त्यांची मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज ते महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनावर राज्य करत आहेत, असं गजेंद्र अहिरे म्हणाले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

पुढे ते असंही म्हणाले, सचिनजी वेळेचे पक्के आहेत. त्यांच्या प्रत्येक कामात शिस्तबद्धता असते. सकाळी सहा वाजताचं चित्रीकरण असेल तर ते पहाटे ५.३० लाच सेटवर मेकअप करुन तयार राहत होते. या चित्रपटातील एका दृश्याचं पहाटे चित्रीकरण करायचं होतं. पहाटे ४- ४.३० च्या दरम्यान समुद्र किनारी निळा रंग पसरतो. केवळ १० ते १५ मिनिटेच वातावरणाचा हा अविष्कार असतो. मात्र सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते यांनी पहाटे येऊन हे शूट पूर्ण केलं. कामाप्रती असलेली ही त्यांची निष्ठा वाखणण्याजोगी आहे.

दरम्यान, कलाकाराचे यश हे त्यांच्या कामावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या अंगी असलेल्या शिस्तीवरच अवलंबून असतं. म्हणूनच सचिन पिळगांवकर आजही मराठी रसिकांसाठी प्रिय आहेत. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा हे निर्माते आहेत. तर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. येत्या २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.