कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक स्वतंत्र स्थान मिळवलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे आपल्या या आवडत्या कलाकाराशी निगडीत प्रत्येक गोष्टींचा संग्रह करणं हा अनेक चाहत्यांचा छंद असतो. त्यामुळे ते बऱ्याच वेळा समीर यांना त्यांची रेखाटलेली चित्रे किंवा फोटो कोलाज भेट म्हणून देखील देत असतात. अशाच एका भेटीचा भन्नाट किस्सा समीर चौगुले यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितला आहे.
दरम्यान, माझे चाहते माझ्यावर मानापासून प्रेम करतात, त्यामुळे ते कायम मला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा माझं चित्र काही चाहत्यांनी काढलं असतं. परंतु, माझी काही चित्र इतकी विचित्र असतात. की, ते चित्र मी कोणाला दाखवूदेखील शकत नाही, असं म्हणत समीर चौगुलेंनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2021 9:21 am