29 September 2020

News Flash

जात-पक्ष-झेंडा-मोर्चा याने काहीच होत नाही ! करोनावर संकर्षण कऱ्हाडेची ही कविता एकदा ऐकाच

सर्वांना घरी राहण्याचं केलं आवाहन

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक दिवशी देशात आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारतर्फे नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीची ठिकाणं टाळा असे सल्ले वारंवार देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात काल जनता कर्फ्यू पाळला गेला. मात्र संध्याकाळी पाच वाजता याला काहीसं गालबोट लागलंच. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी काही भागांमध्ये लोकं गर्दी करुन रस्त्यावर उतरली होती. लोकांमध्ये या विषाणूविषयी जनजागृती वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही आपल्या फेसबूक पेजवर एक सुंदर कविता सादर करत सर्वांना या काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहून आपण सरकारी यंत्रणांना मदत करु असं आवाहन संकर्षणने केलं आहे. एका संकर्षणची कविता…

महाराष्ट्रातही करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतोना दिसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व सुविधा बंद केल्या आहेत. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 4:41 pm

Web Title: marathi actor sankarshan karhade wrote beautiful poem about corona virus crisis psd 91
Next Stories
1 Coronavirus : ‘पाळीव कुत्र्यांना सोडू नका’; रोहित शेट्टीचं नागरिकांना आवाहन
2 परिणितीच्या “तू ही रे” गाण्याला दिली ए. आर. रेहमाननं दाद
3 ‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमीने दिल्या करोनापासून सुरक्षित राहण्याच्या खास टिप्स
Just Now!
X