News Flash

१० वर्षांपूर्वी असा दिसायचा सिद्धार्थ चांदेकर; फोटो पाहून व्हाल थक्क

त्याने नाटकातील फोटो शेअर केले आहेत

नुसत्या एका हसण्याने अनेक तरुणींच्या काळजाचा ठोका चुकवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. लोकप्रियतेत हा चॉकलेट बॉय अनेक बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देतो. कमी कालावधीत सिद्धार्थ चांदेकरने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. यात सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सिद्धार्थला ओळखणंही कठीण आहे.

सिद्धार्थने दोन जुने फोटो शेअर केले असून यात तो नाटकाची तालीम करताना दिसत आहे. यात रस्त्याचं गाणं आणि मित्र माझे अशा दोन नाटकांमधील हे फोटो आहेत.

 

View this post on Instagram

 

दहा वर्षांपूर्वी सुदर्शन रंगमंच पुणे, कडून grips theatre करायला मिळालं. तिथून अभिनय क्षेत्राची ओढ वाढत गेली. तिथे जे शिकलो ते परत कुठेच नाही शिकायला मिळालं. १. पहिले २ फोटो – नाटक (रस्त्याचं गाणं) २. नाटक (मित्र माझे.) @pramodvkale यांनी रस्त्याचं गाणं हे नाटक बसवलं होतं. ते माझे वर्ग शिक्षक होते. त्यांनी मला पहिल्यांदा अभिनय शिकवला आणि इकडे खेचून आणलं. धन्यवाद सर.

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

“दहा वर्षांपूर्वी सुदर्शन रंगमंच पुणे, कडून grips theatre करायला मिळालं. तिथून अभिनय क्षेत्राची ओढ वाढत गेली.तिथे जे शिकलो ते परत कुठेच नाही शिकायला मिळालं. १. पहिले २ फोटो – नाटक (रस्त्याचं गाणं), २. नाटक (मित्र माझे.) @pramodvkale यांनी रस्त्याचं गाणं हे नाटक बसवलं होतं. ते माझे वर्ग शिक्षक होते. त्यांनी मला पहिल्यांदा अभिनय शिकवला आणि इकडे खेचून आणलं. धन्यवाद सर”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थ हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘गुलाबजाम’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’, ‘पिंडदान’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:55 pm

Web Title: marathi actor siddharth chandekar share throwback photo ssj 93
Next Stories
1 ‘बॉलिवूड क्वीन’ हेअरस्टायलिशच्या रुपात; बहिणीचा केला हेअरकट
2 अभिनेत्रीला करोनाची लक्षणं पण चाचणीच कोणी करेना; सरकारकडे केली विनंती
3 ‘लॉकडाउन कमी होतोय पण…’; लता मंगेशकरांचं जनतेला आवाहन
Just Now!
X