News Flash

दिवाळीच्या खरेदीसाठी सिद्धार्थ जाधवची नवी शक्कल

पणत्या, कंदील काहीही असो सिद्धार्थला दिवाळीची खरेदी स्वत: जाऊन करायला आवडते.

सिद्धार्थ जाधव

दिवाळी म्हटलं की लहानथोरांचं पहिलं आकर्षण असतं ते म्हणजे खरेदी.यात अगदी आकाशकंदीलापासून ते फटाक्यांपर्यंत साऱ्या गोष्टींची बाजारात रेलचेल असते. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडली असते. त्यातच एखादा सेलिब्रेटी या गर्दीत आला तर विचारायला नको. त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधवने एक नवी शक्कल लढवत या गर्दीत शॉपिंगचा आनंद लूटला.

खरेदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या सिद्धार्थने चेहऱ्यावर स्कार्फ बांधत चेहरा झाकून घेतला आणि मुंबईमध्ये दिवाळीच्या खरेदीचा आनंद लूटला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि लहान मुलगीदेखील होती.

सिद्धार्थ सध्या त्याच्या उत्तम अभिनयामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्यामुळे तो जिथे दिसेल तेथे चाहते त्याच्या भोवती गराडा घालतात. मात्र अजूनही सिद्धार्थला सामान्य माणसाप्रमाणे जगायला आवडतं. त्यामुळे दिवाळीदेखील सामान्यपणे साजरी करण्यावर त्याचा जोर असतो.पणत्या असो, कंदील असो, की त्याच्या मुलींच्या कपड्यांची शॉपिंग. तो स्वत: जाऊन खरेदी करतो.

‘दिवाळी अगोदरचा रविवार म्हणजे मुंबईच्या बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी असते. मग खरेदी कशी करणार हा प्रश्न होता. त्यात फोर व्हिलर घेऊन रस्त्यावर जाणे, म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणार हे नक्की. म्हणून मग सरळ बाईक काढली, आणि बायको आणि मुलींसह स्कार्फ लावून दिवाळीची पटकन खरेदी आटोपली’, असं सिद्धार्थने सांगितलं.

सिध्दार्थ सध्या रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘सिम्बा’ च्या चित्रीकरणात व्यस्त असून हे चित्रीकरण हैदराबादमधील रामोजी राव येथे सुरु आहे. मात्र दिवाळीसाठी त्याने या शेड्युलमधून वेळ काढत थेट मुंबई गाठल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:15 pm

Web Title: marathi actor siddharth jadhav diwali shopping
Next Stories
1 प्रियांकाचा ‘पाहुना’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘भारत’मधील सर्वात जीवघेणा स्टंट साकारणार युपीमधील रायडर्स
3 पंचविशीपर्यंत मनात आत्महत्येचे विचार यायचे-ए. आर. रहमान
Just Now!
X