News Flash

हाताला चार टाके तरीही उत्साह कायम; क्रिकेटवेडा सिद्धार्थ जाधव

दुखापत होऊनही सिद्धार्थ क्रिकेटचा सराव करतोय.

महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आजवर त्याच्या अभिनय शैलीतून चाहत्यांची मनं जिंकली आहे. सिद्धार्थला जेवढी अभिनयाची आवड आहे तेवढीच क्रिकेटचीदेखील आवड आहे. मोकळ्या वेळेत तो कायम क्रिकेट खेळणं पसंत करतो.

मात्र नुकतीच सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, की सिद्धार्थला ही दुखापत कशी झाली? अनेक तर्कवितर्क तुम्ही लावले असतील. परंतु सिद्धार्थला ही दुखापत एखाद्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नव्हे तर क्रिकेटच्या सरावादरम्यान झाली आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहात आहेत. त्यातच आता मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा कर्णधार सिद्धार्थ असून त्यासाठीचीच सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली. त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले. मात्र उपचार झाल्यावर आराम न करता सरळ हातात बॅट पकडून पूर्वीच्याच एनर्जीने त्यानं सरावाला सुरुवातही केली. यातूनच तो अभिनयासोबतच क्रिकेटच्या बाबतीतही किती पॅशनेट आहे, हे कळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

मुळात सिद्धार्थ हा क्रिकेटप्रेमी आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याने वेळोवेळी आपले हे क्रिकेटप्रेम सोशल मीडियावरून व्यक्तही केले आहे. त्याने पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलेल्या सचिनच्या मॅचचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला होता. क्रिकेट खेळण्याची एकही संधी सिद्धार्थ सोडत नाही. क्रिकेट की आराम असा पर्याय दिल्यावर तो क्रिकेटला प्राधान्य देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:59 pm

Web Title: marathi actor sidharth jadhav injured during cricket practice kpw 89
Next Stories
1 …आणि म्हणून कार्तिक आपल्या नव्या गाडीच्या पाया पडला!
2 Video : म्हणून परिक्षकाने हिसकावलं ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या विजेतीचं मुकूट
3 ‘या’ व्हिडीओमुळे दिशा पटानी झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…
Just Now!
X