News Flash

स्त्री वेशातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का?

अभिनेत्याने शेअर केला फोटो

एक स्त्री होणं किंवा स्त्री वेशात वावरणं फारसं सोपं नाही.मात्र, तरीदेखील अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये स्त्री पात्राची भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली. यात बालगंधर्व यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. बालगंधर्व यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर अशा अनेक कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या. यामध्येच आता एका अभिनेत्याने त्याच्या स्त्री वेशातील फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो स्त्री वेशात दिसत असून त्याने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. ‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेतील त्याचा हा फोटो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by(@swwapnil_joshi)

”तेरे घरच्या समोर ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव मला समृद्ध करून गेलाय. स्त्री भूमिका साकारणं, “ती” होणं खरंच सोपं नाही.”ती” जखमांच गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अश्या प्रत्येक “ती”च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी स्त्री भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत. यात विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुबोध भावे, प्रसाद ओक, दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 9:56 am

Web Title: marathi actor swapnil joshi female dress photo ssj 93
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद; पत्नीसाठी कपिलने घेतला महत्त्वाचा निर्णय
2 वाहिनीसाहेबांच्या घरी युवराजांचे आगमन; धनश्री काडगांवकरला पुत्ररत्न
3 १० वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे बिग बींना आजही केले जाते ट्रोल
Just Now!
X