News Flash

Samantar Trailer : स्वप्नीलच्या दुहेरी भूमिकेने वाढवली उत्कंठा

स्वप्नील जोशी 'समांतर'च्या माध्यमातून पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करत आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्यांच्या भूमिकांविषयी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला तो छेद देण्याचा प्रयत्न करत आहे. विविध चित्रपटांमध्ये झळकलेला स्वप्नील लवकरच ‘समांतर’ या सीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली ‘समांतर’, या वेबसीरिजच्या रूपाने उलगडणार आहे. कुमार महाजन या सामान्य माणसाचा आयुष्याचा रोमांचकारी प्रवास. कुमार महाजनचा या सामान्य माणसाचं आयुष्य बदलत ज्यावेळी त्याला समजत सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे. ‘कुमार महाजन’ साकारत असलेला स्वप्नील जोशी समांतरच्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत आहे.

या वेबसीरिजमध्ये स्वप्नील जोशी सामान्य माणसाचे धकाधकीचे जीवन जगताना दिसणार आहे, कुटुंबाच्या दैनंदिन गरज पूर्ण करताना नाकीनऊ येत असतानाचा कुमारला कामावरुन कमी केलं जातं. त्याची नोकरी जाते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं हे या सीरिजमधून उलगडलं जाणार आहे. या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशींच्या पत्नीची भूमिका साकारत असून ९ भागांची ही वेबसीरिज सतिश राजवाडेने दिग्दर्शित केली आहे.

ही समांतरची कथा ही बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहचावी तसेच तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून ही वेबसीरिज मराठी सोबतच हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी सोबत इतर ३ भाषेत ‘समांतर’ एकाचवेळी १३ मार्च रोजी एम.एक्स.प्लेयर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 4:28 pm

Web Title: marathi actor swapnil joshi new web series samantar trailer out ssj 93
Next Stories
1 Video : मोदींसारखीच रजनीकांतही करणार बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी
2 दीपिकाच्या बिकीनी फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान
3 ट्रोल झालेल्या नुशरतच्या ‘त्या’ ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Just Now!
X