News Flash

अभिनेता वृषभ शाहने त्याच्या २५व्या वाढदिवसानिमित्त केली किन्नर समाजाला मदत

वृषभ लवकरच 'मंगलाष्टक रिटर्न' आणि 'वन फोर थ्री' या चित्रपटात दिसणार आहे.

vrushabh shah did help transgender on his 25th birthday
वृषभ लवकरच 'मंगलाष्टक रिटर्न' आणि 'वन फोर थ्री' या चित्रपटात दिसणार आहे.

सध्या सर्वच कलाकार करोना अभावी गरजूंसाठी मदतीचे हात पुढे सरसावताना दिसत आहेत. कलाकारांनी केलेली मदत ही काय नवीन नाही. मात्र तरुण, नवकलाकारांनी पुढे केलेला हा मदतीचा हात नक्कीच कौतुकास्पद ठरेल. अभिनेता वृषभ शाह हा नवोदित कलाकार असून आता लवकरच तो ‘शारदा प्रॉडक्शन’ निर्मित ‘मंगलाष्टक रिटर्न’ आणि ‘वन फोर थ्री’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आज ६ जुलै वृषभचा वाढदिवस. त्याच्या २५व्या वाढदिवसानिमित्त त्याने काही वस्तीतील किन्नर लोकांना धान्य वाटप केले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याने मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याची ही कर्तबगारी अर्थातच कौतुकास्पद आहे.

वृषभची ही धाडसी आणि मदतीसाठी पुढे सारसावणारी वृत्ती नक्कीच त्याच्या अभिनयातुन दिसेल यातही शंकाच नाही. अशा प्रकारची मदत करून वृषभने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच घर केले आहे.

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

अभिनेता वृषभ शाह याचा ‘वन फोर थ्री’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वृषभ नक्कीच त्याच्या अभिनयातुन प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल. नेहमीच अभ्यासू, मेहनती असलेला वृषभ लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि सामाजिक भान ठेवून आपल्यापुढे कामाचे आदर्श ठेवणाऱ्या अशा या अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वृषभच्या या २५व्या वाढदिवसानिमित्त त्याला वडील वीर कुमारजी शाह आणि आई वृषाली शाह यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिग्दर्शक योगेश भोसले यांनी देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : रणवीरचा ऑडिशन व्हिडीओ पाहून तुम्हाला ही होईल हसू अनावर

 

View this post on Instagram

 

A post shared by Vrushabh Shah (@vrushabhshahofficial)

वाढदिवसाच्या निमित्ताने वृषभची ही आगळीवेगळी मदत करण्याची वृत्ती, समाजाबद्दलची असणारी आपुलकी नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील. त्याची ही उल्लेखनीय कामगिरी नक्कीच त्याच्या भावी आयुष्यात त्याच्या कामी येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2021 12:10 pm

Web Title: marathi actor vrushabh shah did help transgender on his 25th birthday dcp 98
Next Stories
1 रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं माझ्या मेसेजची दखलही घेतली नाही – तापसी पन्नूची खंत
2 मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकणार लग्न बंधनात
3 ‘सुपरमॅन’चे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन