मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे यशोमान आपटे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेला यशोमान लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे.

‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ या नव्या म्युझिक अल्बममध्ये यशोमान झळकणार असून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या अल्बममध्ये यशोमानचा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन कृतिक मझीर यांनी केलं आहे. तर निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे.

Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Mumbai Chennai Gujarat Bangalore and Delhi attention to the performance of these teams in IPL
विश्लेषण : मुंबई, चेन्नई सहाव्यांदा, की बंगळूरु पहिल्यांदा… आयपीएलमध्ये यंदा कोणाची सरशी?

दरम्यान, यशोमानचा हा पहिलाच म्युझिक अल्बम असून यापूर्वी तो काही मालिकांमध्ये झळकला आहे. यात त्याच्या ‘फुलपाखरु’, ‘श्रीमंता घरची सून’ या मालिका विशेष गाजल्याचं पाहायला मिळतं.