भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ असं या चित्रपटाचं नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संरक्षणमंत्र्यांची भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे.

मराठी अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण हे ‘उरी’मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भूमिकेत आहेत. या टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते.
दि. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पीओकेत घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
yogesh soman
योगेश सोमण

पुढच्या वर्षी ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकी कौशल व यामीसोबतच चित्रपटात मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत.