अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे हे सध्या चर्चेत नसले तरीही त्यांच्या नातीने मात्र आपल्या आपल्या आजोबांचा  वसा उचलला आहे असंच म्हणावं लागेल. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ आणि सून उर्मिला यांची मुलगी जिजा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या जन्मापासूनच प्रकाशझोतात असणारी जिजा ही बहुधा पहिलीच मराठी स्टारकिड असावी.

उर्मिला आणि आदिनाथ हे दोघंही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे ते नेहमीच जिजाचे काही सुरेख फोटो पोस्ट करत असतात. मुख्य म्हणजे उर्मिला पोस्ट करत असणाऱ्या फोटोंमध्ये जिजाचंही सेल्फीप्रेम पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने जिजाच्या पहिल्या विमान प्रवासादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘बाबांना भेटण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करतो तेव्हा…’

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

तिने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जिजाच्या चेहऱ्यावर असणारं निरागस हास्य नकळतच अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित खुलवून गेलं. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच चिमुकल्या जिजाच्या या रुपावर भाळल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोठारेंच्या घरातील ही लाडाची जिजा आता सर्वांनाच आपलीशी वाटू लागली आहे, असंच म्हणावं लागेल. दरम्यान, जिजाच्या जन्मानंतर उर्मिलाने चित्रपटसृष्टीपासून दूर राहत मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केलं आहे. तर आदिनाथ त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात तो ‘पाणी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.