भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. धोनीने क्रिकेटविश्वातील त्याचे वेगळेपण सातत्याने अधोरेखित केले. त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे धोनीच्या निवृत्तीवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आमच्या हृदयात तुझी खास जागा आहे’, अशा शब्दांत व्यक्त होत मराठी कलाकारांनी धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी तू निवृत्ती घोषित केली असली तरी तुझ्या नेतृत्वकौशल्यासाठी आणि खेळाडू म्हणून तुझ्या अंगी असलेल्या गुणांसाठी माझ्या हृदयात खास जागा आहे. तुझा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत सोनाली कुलकर्णीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

तर ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विश्वचषकातील एक फोटो पोस्ट करत धोनीच्या निवृत्ताची बातमी धक्कादायक असल्याचं व्यक्त केलं.

अभिनेता सुमीत राघवन याने हॅम्लेट या नाटकातील ओळ लिहित धोनीच्या निवृत्तीची बातमी ऐकून दु:खी असल्याचं म्हटलं.

गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्या सामन्यानंतर धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची, परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रिमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले.