News Flash

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचंही ‘जय श्री राम’

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. सुमीर राघवन, सुबोध भावे, प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर ‘जय श्री राम’ असं ट्विट केलं आहे.

पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील. त्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेतील आणि भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

मंदिराचे प्रारूप

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 9:51 am

Web Title: marathi actors tweet amid ram mandir ayodhya bhoomi pujan ssv 92
Next Stories
1 ‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे आला होता काजोलचा राग
2 ‘तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय’; किल्ल्यांची दुरावस्था पाहून हेमंत ढोमेचं ट्विट
3 “किशोरदांसारखा ना कोणी होता, न कोणी होणार”; जावेद अख्तर यांनी दिला आठवणींना उजाळा
Just Now!
X