28 February 2020

News Flash

Photo : अलका कुबल यांच्या मुलीचा पार पडला रोका

पाहा, कोण आहे अलका कुबल यांचा जावई

‘माहेरची साडी’ या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करुन त्यांच्या मनात एक खास जागा मिळविलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल- आठल्ये. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. याच अलका कुबल आता लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांच्या लेकीचा इशानीचा नुकताच रोका समारंभ पार पडला आले. अलका यांनी इन्स्टाग्रामवर या रोका सेरेमनीमधील काही फोटो शेअर करत ही माहिती दिली.

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. या पैकी त्यांची थोरली लेक इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला.

 

View this post on Instagram

 

Daughter’s roka ceremony

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_official) on

 

View this post on Instagram

 

like mother like daughter

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_official) on


इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच स्थायिक आहे. अद्याप केवळ यांचा रोका पार पडला आहे. मात्र ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हे स्पष्ट झालेलं नाही.

First Published on January 22, 2020 10:04 am

Web Title: marathi actress alka kubal athalye daughter roka ceremony ssj 93
Next Stories
1 माझ्याविषयीची ‘ती’ केवळ अफवा – आलिया भट
2 बाबा व साधनाताई आमटेंवर चित्रपट निर्मिती करणार – नाना पाटेकर
3 …म्हणून चित्रपटगृहात जाऊनही उद्धव ठाकरेंनी नाही पाहिला ‘तान्हाजी’
Just Now!
X