करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे सध्या लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे अनेकांना त्यांचे नियोजित प्लॅन रद्द करावे लागले आहेत. अनेकांना त्यांचे लग्नकार्य पुढे ढकलावं लागलं आहे. तर अनेकांना या लॉकडाउनच्या काळातच वाढदिवस साजरे करावे लागले आहेत. मात्र प्रत्येक जण या संकटातही आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यात अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील तिच्या आईचा वाढदिवस खास करण्यासाठी एक सरप्राइज प्लॅन केलं होतं. विशेष म्हणजे तिचं हे सरप्राइज तिच्या आईला हे सरप्राइज प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळालं.
लॉकडाउन असल्यामुळे अनेकांना त्यांचे वाढदिवस, अॅनिव्हर्सरी यांचं सेलिब्रेशन करता आलं नाही. मात्र अनेकांनी हे दिवस घरच्या घरी खास पद्धतीने साजरी केले. त्याप्रमाणेच अमृतानेही तिच्या आईचा वाढदिवस अविस्मरणीय ठरवा यासाठी स्वत: च्या हाताने केक केला.
अमृताने केक करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबतच झटपट तयार होणारा हा केक कसा तयार करायचा याची कृतीही तिने सांगितली आहे. या व्हिडीओमध्ये अमृता मोठ्या उत्साहात हा बर्थ डे स्पेशल केक करत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अमृताने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग अफाट आहे. या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची भेट घेत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 12:12 pm