News Flash

अमृता पवारची ‘जिगरबाज’ मालिका लवकरच

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेनंतर अमृता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अमृता आता लवकरच एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोनी मराठीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेच्या माध्यमातून अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिगरबाज या मालिकेत अमृता डॉ. अदिती हे पात्र साकारत आहे. एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली अदिती त्यांच्या घरातली पहिली डॉक्टर आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असं काम तिला करायचं आहे. मात्र, छोट्या गावातून आल्यामुळे ती थोडी भित्री असल्याचं दिसून येतं.

दरम्यान, येत्या ११ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अमृतासोबत अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 1:23 pm

Web Title: marathi actress amruta pawar new tv show jigarbaaz coming soon ssj 93
Next Stories
1 ‘किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं’; अर्णब गोस्वामींच्या अटकेवर दिग्दर्शक समाधानी
2 ‘बेरोजगारी हिच खरी बिहारची समस्या’; तेजस्वी यादव यांच्या व्हिडीओवर दिग्दर्शकाचा टोला
3 ‘बहिर्जी’मधून उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी शिलेदाराची गाथा
Just Now!
X