25 November 2020

News Flash

 देवमाणूसमधील ‘ही’ अभिनेत्री आहे स्वप्नील जोशीची जबरा फॅन

अभिनेत्रीने स्वप्नीलसोबत केला भन्नाट डान्स

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सध्या रंगतदार ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच अभिनेता स्वप्नील जोशी या कार्यक्रमाचा भाग झाला असून यात तो महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशी या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. विशेष म्हणजे स्मार्टनेस आणि अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज त्याचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर कलाविश्वातील काही कलाकारदेखील त्याचे चाहते असल्याचं हवा येऊ द्याच्या सेटवर पाहायला मिळालं.

सध्या छोट्या पडद्यावर ‘देवमाणूस’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. अलिकडेच ‘देवमाणूस’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील काही कलाकारांनी हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी देवमाणूस मालिकेतील डिंपल म्हणजेच अस्मिता देशमुखने ती स्वप्नीलची मोठी चाहती असल्याचं सांगितलं.

या कार्यक्रमाच्या सेटवर अस्मिताने स्वप्नीलसोबत टिकटिक वाजते डोक्यात या गाण्यावर डान्स केला. तर गुंतलेला श्वास हा हे गाणं सादर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 5:03 pm

Web Title: marathi actress asmita deshmukh fan swapnil joshi ssj 93
Next Stories
1 ‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गईं हैं’; राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 आगामी चित्रपटांसाठी कंगना रणौतची मेहनत; शेअर केला फोटो
3 आणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X