News Flash

मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलिवूडकडे वाटचाल

हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचादेखील समावेश होणार आहे.

मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलिवूडकडे वाटचाल
भाग्यश्री मोटे

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. विविध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या भाग्यश्रीकडे सध्या अनेक चित्रपट असून, लवकरच ती एका बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचादेखील समावेश होणार आहे. आगामी वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षदेखील तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, यावर्षी सलग तीन मराठी चित्रपटांद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यापैकी ‘पाटील’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. लवकरच तिचा ‘विठ्ठल’ हा चित्रपटदेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. त्यातच तिच्या पदरात बॉलिवूडचा आणखी एक नवा चित्रपट पडला आहे.

ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हार्दिक गज्जर हे सांभाळत असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गोंडस आणि गोजिऱ्या चेहऱ्याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली असून, मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलिवूड एंट्री पाहण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 7:13 pm

Web Title: marathi actress bhagyshree mote entry in bollywood
Next Stories
1 2.0 Movie Review : बॉक्सऑफिसवर रजनीचं राज्य कायम
2 कुत्र्याच्या हल्ल्यात अभिनेत्री निया शर्मा जखमी
3 Rajinikanth’s 2.0 mania : 2.0 पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी
Just Now!
X