आतापर्यंत दार उघड बये.. अशी साद घालत तमाम वहिन्यांना खेळवणारे भाऊजी महाराष्ट्राला माहिती होते. आता याच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ‘आक्कासाहेब’ म्हणून छोटा पडदा दणाणून सोडणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर घराघरांतील तमाम नवऱ्यांना खेळवताना दिसणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरच्या आगामी ‘नवरा असावा असा’ या गेम शोचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करणार असून आयुष्यात पहिल्यांदाच या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याने या शोबद्दल उत्सुकता जास्त असल्याचे तिने स्पष्ट केले.

‘कलर्स मराठी’वर गेल्या काही दिवसांपासून हर्षदा एका वेगळ्या लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येऊन नवरा-बायकोच्या नात्याची व संसाराची कथा कथन करताना दिसत होती तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये खासकरून महिलावर्गामध्ये त्यांच्या या नवीन शोविया शोबद्दल उत्सुकता जास्त असल्याचे तिने स्पष्ट केले.षयी कु जबुज सुरू झाली होती. या नवीन शोची माहिती सांगताना ‘नवरा असावा तर असा’ हा गेम शो आहे, त्यामुळे या शोच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे ती म्हणाली. ‘नवीन लग्न झालेल्या जोडप्यांपासून ते प्रेमाचा गोडवा अनंत वर्ष टिकवून ठेवणाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या जोडप्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी वाहिनीने दिली आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच पत्नीकडून पतीला आव्हान देण्यात येणार आहे. ते आव्हान त्याला स्वीकारत एक एक टप्पा पूर्ण करत ते विजेतेपदापर्यंत पोहोचणार असल्याने त्यांचा हा मजेशीर प्रवास पाहणं हे त्यांच्या बायकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही मजेशीर ठरणार आहे. मात्र या शोची गंमत काही वेगळीच आहे. खेळ नवरे खेळणार असले तरी विजेतेपदाची माळ बायकोच्या गळ्यात पडणार आहे. तेव्हाच तर बायकोच्या तोंडून ‘नवरा असावा तर असा’ असे कौतुकाचे बोल बाहेर पडतील आणि तेच या शोचे वेगळेपण ठरणार असल्याचेही हर्षदाने सांगितले.

Do Muslims have more children Narendra Modi population of Muslims
मुस्लिमांना अधिक मुले असल्याचे मोदींचे वक्तव्य; आकडे काय सांगतात?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

‘नवरा असावा असा’ हा गेम शो ‘कलर्स मराठी’वर १८ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता पाहता येणार आहे. या शोमध्ये एरव्हीही बायकोचे मन जिंकण्यासाठी धडपडणाऱ्या नवरोबांना तिला जिंकून देण्यासाठी खेळात सहभाग घ्यावा लागणार आहे. मालिका आणि चित्रपटांमधून काम केल्यानंतर अचानक सूत्रसंचालकाची भूमिका स्वीकारण्यामागचे कारण स्पष्ट करताना, गेली सहा वर्ष आक्कासाहेबांची यशस्वी भूमिका केल्यानंतर मला ‘हर्षदा खानविलकर’ या नावानेच प्रेक्षकांसमोर येण्याची इच्छा होती. आणि ती इच्छा या कार्यक्रमाने पूर्ण होणार होती म्हणून मी ही भूमिका स्वीकारली’, असे तिने सांगितले. ‘मी आयुष्यात पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार आहे. कॉलेजमध्ये असतानादेखील मी सूत्रसंचालन कधीच केलं नव्हतं. सध्या या शोला नुकतीच सुरुवात झाली असल्याने साहजिकच थोडं दडपण आहे, पण दिग्दर्शकाच्या टिप्स पाळून मी माझ्या सहजपद्धतीने सूत्रसंचालन करणार’, अशी खात्रीही तिने व्यक्त केली. जी गोष्ट आपण आजवर कधीच केली नाही ती आता करणार असल्याने आपण प्रचंड उत्साहात असून या शोच्या निमित्ताने रंगीबेरंगी साडय़ा, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, केसांमध्ये रंगीबेरंगी फुलं आणि शोगणिक बदलणारी हेअरस्टाइल अशा पूर्ण आधुनिक अवतारात आपण प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहितीही तिने दिली.

शोची संकल्पना वेगळी असल्याने चित्रीकरण सुरू झालं तेव्हा काही दडपण होतं का?, असा प्रश्न विचारला असता शोच्या सुरुवातीला अडचणी येणं, दडपण असणं साहजिकच आहे, असं तिने सांगितलं. ‘दररोज अनोळखी माणसांमध्ये जाऊन त्यांच्यात समरस होऊन त्यांना सलग बोलतं ठेवणं हे तसं सूत्रसंचालकासाठी कठीणच असतं. पण मुळातच माझा स्वभाव गप्पिष्ट असल्यामुळे आणि मला माणसांशी गप्पा मारण्याची आवड असल्यामुळे माझं तसं कुठे काही अडत नाही. या शोसाठी माझा रोजचा दिवस नवीन आहे. या शोसाठी कुठलीही एक ठरीव पद्धत वापरणं चुकीचं ठरू शकतं. त्यातलं नावीन्य हेच त्याचं सौंदर्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे कालचा दिवस संपवून उद्या उगवतीच्या सूर्याबरोबर पुन्हा अनुभवाचं गाठोडं पक्क करायला मी सज्ज झाले आहे. रोजची पाटी इथे कोरी आहे’, असं सांगणाऱ्या हर्षदाने गेली अठरा वर्ष लेखकाने शब्दबद्ध केलेली पटकथा हातात घेऊन वाचण्याची सवयही इथे मोडीत निघाल्याचं सांगितलं. या शोमध्ये स्वत:चे विचार आणि अनुभवांच्या जोरावर ही भूमिका पुढे न्यावी लागणार ते माझ्यासाठी एक आव्हानच आहे, असे तिने सांगितले. या शोमध्ये खेळ नवरा खेळणार आणि बक्षिसे मात्र बायकोला हा काय प्रकार आहे? असाही विचार प्रेक्षकांच्या मनात डोकावतो आहे. हा प्रश्न साहजिक असला तरी ‘लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आयुष्यात पूर्ण बदल होत नाहीत. ते थोडय़ाफार फरकाने आहे तसंच पुढे जात असतं. बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद सदासर्वकाळ टिकवून ठेवण्यासाठी झिजणारा हा नवराच असतो. त्याचे हे कष्ट बायको देखील बघत असते. त्यामुळे वरवर जरी हा बायकांना जिंकून देणारा गेम शो आहे असे वाटत असले तरी तो समस्त नवरे वर्गाच्या कौतुकाचा सोहळा आहे. बायकोचे, कुटुंबाचे मन जपण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड आणि सरतेशेवटी त्याने शो जिंकल्यानंतर बायकोच्या डोळ्यांत चमकणारा आनंद असा हा एकमेकांना समजून घेत जिंकून देणारा वेगळा शो असल्याचे तिने सांगितले.

‘जगातील सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे बायकोच्या मनामध्ये काय सुरू आहे हे ओळखणं. प्रत्येक नवऱ्याला या प्रश्नाचं उत्तर शोधणं नेहमीच एक आव्हान वाटतं. नवरा-बायकोच्या नात्याची हीच गंमत आहे. या कार्यक्रमाद्वारे घराघरांतल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. म्हणूनच ‘नवरा असावा असा’ हा वेगळ्या संकल्पनेवरचा शो आम्ही प्रेक्षकांसाठी आणतो आहोत आणि तो त्यांना नक्कीच आवडेल, असा विश्वास ‘कलर्स मराठी-वायकॉम -१८’ चे निखिल साने यांनी व्यक्त केला.