मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांच्या तालावर दिलखेचक ताल धरून रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिच्या ‘जवानी झिंदाबाद’ या आगामी चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटातील ‘आना रे..’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव कदम यांनी केलं आहे. तर निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केलं आहे. या चित्रपटातून अभिषेक साठे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तर केतकी नारायण मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.


एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजनासोबतच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.