News Flash

“लाल साडी आणि भेदक नजर… मितालीच्या बोल्ड लूकवर चाहते फिदा

सोशल मीडियावर मितालीच्या लूकची चर्चा

मराठी सिनेसृष्टीतील हॉट जोडी म्हणजे मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर. 24 जानेवारीला सिद्धार्थ आणि मितालीचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो चांगलेचं व्हायरल झाले होते.

लग्न झाल्यानंतरही मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मिताली अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. मितालीच्या फोटोंना चाहत्यांकडून कायम पसंत केलं जातं. लग्नानंतर मितालीच्या लग्नातील वेगवेगळ्या लूकची चांगलीच चर्चा रंगली.

नुकताच मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या मंचावरचे हे फोटो आहेत. या फोटोमध्ये मितालीचा लाल साडीतील हॉट लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कुरळे केस असा मितालीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. काही तासातच मिलातीच्या या फोटोला हजारो लाईकस् मिळाले आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ य़ा शोच्या विशेष भागासाठी मितालीने हा खास लूक केला आहे. या फोटोला अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने “वा.. काय दिसतेय तू” अशी कमेंट दिली आहे. तर अनेक चाहत्यांनी मिताली या फोटोत खूप सुंदर दिसत असल्याचं म्हंटल आहे.

बोल्ड अँड ब्युटीफुल! जान्हवी कपूर

मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कौस्तुरी ही भूमिका साकारतेय. तर सिद्धार्थ स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 2:47 pm

Web Title: marathi actress mitali mayekar share photo in red saree looking hot kpw 89
Next Stories
1 भारतातला एकेकाळचा सगळ्यात मोठा घोटाळा, अभिषेक बच्चन सांगणार त्याविषयी!
2 पहा आता तैमूरला करावं लागतंय घरातलं काम!; लहान भावासाठी काय पण…
3 “तू मिस वर्ल्ड आहेस म्हणून काय झाल?”; कोरिओग्राफरने प्रियांकावर फेकला होता माईक
Just Now!
X