मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. आज मोठ्या धुमधडाक्यात या जोडीने साताजन्माची गाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र, आज अखेर कुटुंब आणि मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी लग्न केलं आहे.
मिताली आणि सिद्धार्थ या जोडीने लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. यामध्ये ‘cine gossips’ ने सिद्धार्थ -मितालीच्या सप्तपदीचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपरिक पद्धतीने सिद्धार्थ-मितालीने लग्न केलं आहे. अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला असून मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. दरम्यान, या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे असे अनेक सेलिब्रिटी हजर होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 1:34 pm