News Flash

लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; पाहा मितालीचा नवा लूक

मिताली मयेकरचा नवा लूक पाहिलात का?

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकप्रिय जोड्यांनी लग्नगाठ बांधली. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. या दोघांचा लग्नसोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. अगदी त्यांच्या केळवणापासून ते लग्नसोहळ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. विशेष म्हणजे लग्नानंतरही या जोडीची चर्चा कमी होण्याचं नाव घेत नाही. सध्या सोशल मीडियावर मितालीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने मेकओव्हर केल्याचं दिसून येत आहे.

सध्या मिताली आणि सिद्धार्थ त्यांच्या लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. यामध्ये मितालीने लग्नानंतर केलेल्या मेकओव्हरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मितालीने तिचा हेअर कट केल्याचं दिसून येत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने तिचा हा नवा फोटो शेअर केला आहे.

मितालीने Before आणि After असे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत तिचे लांबसडक केस दिसून येत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिने केलेला हेअरकट पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मितालीचा हा नवा लूक चाहत्यांना आवडला असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. २४ जानेवारी २०२१ रोजी मिताली-सिद्धार्थने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 5:29 pm

Web Title: marathi actress mithali mayekar after marriage makeover photo ssj 93
Next Stories
1 Video : बहुप्रतिक्षीत ‘आचार्य’चा टीझर प्रदर्शित; पाहा, चिरंजीवीचा दमदार लूक
2 एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ‘देसी गर्ल’ किती मानधन घेते माहित आहे का?
3 ‘हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे’; तांडव प्रकरणावर मुकेश खन्नांची आगपाखड
Just Now!
X