News Flash

Video: “कलाकार म्हणून ग्लॅमरस आणि बोल्ड होणं गरजेचं”, मोनालिसा बागलचा खुलासा

'या' रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाला भोबाटा’, परफ्यूम, ड्राय डे अशा सिनेमांसोबत झी मराठी वाहिनीवरील ‘टोटल हुबलाक’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मोनालिसा बागलला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. मोनालिसाने लॉकडाउनच्या काळात ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या कॉमेडी शोमधूनही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय.

येत्या काळात मोनालिसा वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकसत्ता डिजिटल अड्डावर मोनालिसाने तिच्या आगामी प्रोजेक्टस् बद्दल खुलासा केला आहे. एकाच धाटणीची भूमिका न करता वेगवेगळ्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. ‘भिरकीट’ या सिनेमातून मोनालिसाचा अनोखा अंदाज पाहायला मिळणारं आहे. तर ‘करंट’ या सिनेमातून तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांसमोर येऊ शकतो. या सिनेमाचं पोस्टर आधीच लॉन्च झालं असून. या पोस्टरमुळे मोनालिसा चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या या बोल्ड लूकवर मोनालिसाने प्रतिक्रिया दिलीय. एकंदर लाकडाउनचा काळ हा मोनालिसासाठी उत्तम गेल्याचं ती म्हणालीय.

यासोबतच मोनालिसा वेब सीरिजमधूनही झळकरणार आहे. अभिनयासोबतच चित्रपट वितरक अशी दुहेरी भूमिका ती सांभाळतेय. तिच्या या वेगळ्या भूमिकेवर तिने या मुलाखतीत भाष्य़ केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 7:17 pm

Web Title: marathi actress monalisa bagal digital adda interview said as an artist i have to be bold and glamours kpw 89
Next Stories
1 “माझ्या नव्या बायकोला भेटा”; अभिनेता विजय वर्माच्या पोस्टवर आयुष्यमान म्हणाला..
2 ‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी, जाणून घ्या कारण
3 पन्हाळ्यावरून सुटका, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत चित्तथरारक पर्व
Just Now!
X