01 December 2020

News Flash

मोनालिसाचा ‘करंट’ देणारा अंदाज पाहिलात का?

आगामी चित्रपटासाठी मोनालिसा सज्ज

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी कलाविश्वामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध नाटक, मालिका यांच्या माध्यमातून नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मोनालिसा बागल. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर मोनालिसाचा आता स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. त्यातच मोनालिसा एका धडाकेबाज चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे सध्या या चित्रपटाच्या नावाची चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘करंट’ या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिका साकारणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र, या चित्रपटविषयी फारसा खुलासा मोनालिसा किंवा दिग्दर्शकांनी केलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. हा चित्रपट २१ मे २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मोनालिसा बागल हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे. सौ. शशी देवधर या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर मोनालिसाने अभिनेत्री म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:08 pm

Web Title: marathi actress monalisa bagal new movie karant coming soon ssj 93
Next Stories
1 “तेजस्वी यादवच जिंकणार”; महाआघाडीच्या विजयासाठी फराह खानची प्रार्थना
2 ‘अमेरिकेतील सत्ता गेली अन् आता बिहारची बारी’; प्रकाश राज यांचा उपरोधिक टोला
3 नोज रिंग आणि काजळ…न्यूड फोटोनंतर पुन्हा एकदा मिलिंद सोमण चर्चेत
Just Now!
X