News Flash

मृणाल कुलकर्णीच्या लेकाचं कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

जाणून घ्या, मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाविषयी

छोट्या पडद्यावर रोज नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही काळापूर्वी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकांच्या यादीमध्ये आता ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या मालिकेची तोंडओळख प्रेक्षकांना झालीच आहे. त्यामुळे या नव्या मालिकेत काहीतरी छान पाहायला मिळणार अशी भावना सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच सध्या या मालिकेमधील काही कलाकार प्रेक्षकांसमोर आले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी देशपांडे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र तिच्यासोबत झळकणारा अभिनेता कोण हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. विशेष म्हणजे हा नवोदित अभिनेता आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं खास नातं असून नुकताच त्यांच्या नात्याचा उलगडा झाला आहे.

विविध मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. ‘अवंतिका’,’सोनपरी’ या मालिकेमुळे ती आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. कलाविश्वात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविल्यानंतर मृणाल कुलकर्णीच्या मुलाने मराठी मालिकेच्या माध्यमातून या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकणारा नवोदित अभिनेता मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा असून त्यांचं नाव विराजस कुलकर्णी असं आहे.

 

View this post on Instagram

 

Arey yaar…

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13) on

वाचा : Photo : महागुरुंच्या कन्येचा हॉट अवतार!

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होईल. या मालिकेत विराजस मुख्य भूमिका साकारत असून त्याची ही पहिलीच मालिका असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या मालिकेत त्याच्यासोबत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी अशी दिग्गज कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करणार आहे. ही मालिता येत्या २ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 9:02 am

Web Title: marathi actress mrinal kulkarni son virajas kulkarni debut on majha hoshil na ssj 93
Next Stories
1 Movie Review : पुरुषच नाही तर महिलांच्याही मानसिकतेला चपराक लगावणारा ‘थप्पड’
2 ‘भाईजान’ धावला कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी; ‘हे’ गाव घेतलं दत्तक
3 शुटिंगआधीच करण जौहरचा ‘तख्त’ वादात; लेखकाचं ‘हिंदू दहशतवादी’ ट्विट पडलं महागात
Just Now!
X