X

पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास मृणाल सज्ज

मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

माझी या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत आहे. कलर्स मराठीवरील अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने वठविलेली जुईची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. लग्न झाल्यापासून मृणालने छोट्या पडद्यापासून फारकत घेतली होती. परंतु आता मृणाल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.

मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाली असून कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘हे मन बावरे’ मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. मालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राऊत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

मालिकेची कथा काय असेल ? मालिकेमध्ये अजून कुठले कलाकार असतील ? हे सगळे गुलदसत्यातच आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “हे मन बावरे” ९ ऑक्टोबरपासून फक्त कलर्स मराठीवर.