बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेकलाकारांप्रमाणेच आता मराठी कलाकार देखील सिनेउद्योगातील इतर क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. परिणामी अनेक मराठी अभिनेता-अभिनेत्री आता अभिनयाबरोबरच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवताना दिसू लागले आहेत. या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे देखील नाव आता जोडले गेले आहे.
मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: मृण्मयी करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत या चित्रपटातील अनेक रंजक किस्से सांगितले.
पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 3:58 pm