News Flash

मराठी अभिनेत्रीचा विदेशात डंका; नेहा महाजन-रिकी मार्टिनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी नॉमिनेशन’

या म्युझिक अल्बमसाठी नेहाने सितारवादन केलं आहे.

मराठी अभिनेत्री नेहा महाजन व लॅटिन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या म्युझिक अल्बमला मोठं यश मिळालं आहे. या अल्बमला अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांत नामांकन मिळाले आहे. या म्युझिक अल्बमसाठी नेहाने सितारवादन केलं आहे.

नेहा व रिकी यांच्या ‘Pausa’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट लॅटिन पॉप विभागात नामांकन मिळालं आहे. नेहा उत्तम सितारवादक असून तिने तिच्या वडिलांकडून सितारवादनाचे धडे घेतले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत नेहाने नामांकनाची मोठी बातमी चाहत्यांना सांगितली. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial)

संधी कशी मिळाली?
“म्युझिक अल्बमसाठी जानेवारीत रिकीने मला फोन केला होता. या म्युझिक अल्बममध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत सितारवादन करशील का, असं त्याने मला विचारलं होतं. मी रिकीला शाळेत असल्यापासून ऐकत आले आहे. त्यामुळे मी लगेचच होकार कळवला”, असं नेहाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अभिनयासोबतच संगीताचीही आवड
जवळपास गेल्या बारा-तेरा वर्षांपासून नेहा सितारवादनाचे धडे गिरवत आहे. इतक्या वर्षांच्या प्रशिक्षणानंतर तिने सितारवादनात प्रभुत्व मिळवलं आहे. नेहा अनेकदा सोशल मीडियावर सितारवादनाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 9:07 am

Web Title: marathi actress neha mahajan and ricky martin music album got a grammys nomination ssv 92
Next Stories
1 अभिनेत्री इशा केसकरला पितृशोक
2 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा
3 करणच्या पोस्टला मधुर भांडारकर यांचे उत्तर, म्हणाले…
Just Now!
X