News Flash

पाच वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण

या अभिनेत्रीने दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे

आनंदी हे जग सारे या मालिकेने थोड्याच काळात प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान बनवले आहे. एका स्वमग्न मुलीची कथा, तिची जगण्याची जिद्द आणि स्वमग्न मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन या विषयावर ही मालिका भाष्य करते. आतापर्यंत या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची प्रेक्षकांना ओळख झाली आहे. मात्र आता या मालिकेत नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.

हिंदी आणि मराठी या दोन्ही कलाश्वामध्ये गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची मालिकेत एण्ट्री होणार आहे. तब्बल ५ वर्षानंतर नीना कुळकर्णी या मराठी मालिकांमध्ये पुनरागमन करत आहेत. आधीच गुणी कलाकारांच्या अभिनयाने बहरलेल्या या मालिकेत नीना कुळकर्णी यांच्या येण्याने नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आता नीना कुळकर्णी यांची ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत कोणती भूमिका असेल हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, जागतिक महिला दिनाच्या पार्श्ववभूमीवर आलेल्या ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील कुळकर्णी यांची महत्वाची भूमिका आहे या भूमिकेसाठी त्यांचं बरंच कौतुक देखील केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:12 pm

Web Title: marathi actress nena kulkarni comeback marathi tv show ssj 93
Next Stories
1 विठुमाऊली मालिकेची भक्तीपूर्ण होणार सांगता
2 मलायकाने कपडे घातले की नाही? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
3 Guilty Movie Review : अन्याय, अत्याचाराविरोधातला हुंकार!
Just Now!
X